शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रभाग क्रमांक 9 ची बैठक संपन्न

पाषाण : पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुस बाणेर बालेवाडी प्रभाग क्रमांक ९ ची समन्वय बैठक पाषाण येथे संजय निम्हण यांच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात येणार उमेदवाराचे सर्वानुमते काम करण्याचा ठराव यावेळी बैठकीत मांडण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य संघटक पदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल बाळासाहेब भांडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष तोंडे विभाग प्रमुख, संजय निम्हण विभाग समन्वयक, ज्योती चांदेरे उप शहर संघटिका, स्वातीताई रणपिसे विभाग संघटिका, नितीन चांदेरे, अशोक दळवी, रामभाऊ निम्हण, युवा सेना उपशहर प्रमुख सरपंच महाळुंगे मयूर भांडे, शाखा संघटिका सुनीता रानवडे, महेश सुतार शिव दूत, ऋषिकेश कुलकर्णी प्रभाग प्रमुख दशरथ खेडेकर प्रभाग संघटक, अमोल फाले शाखाप्रमुख, सुरज चोरमले शाखा संघटक उपस्थित होते.

See also  आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायदा महत्वाचा-केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज