खा. डॉ. मेधा कुलकर्णी जागतिक महिला परिषदेसाठी मेक्सिको ला रवाना

पुणे : आय.पी.यू. (International Parliamentary Union) च्या Global Women Conference मेक्सिको येथे आयोजित करण्यात आले असून या कॉन्फरन्ससाठी खा. डॉ. मेधा कुलकर्णी सहभागी होण्यासाठी रवाना झाल्या.


या तीन दिवसीय परिषदेसाठी राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी कुलकर्णी यांना नामदेर्देशित करण्यात आले असून या परिषदेत विविध देशातील महिला खासदारांचा समावेश असणार आहे.  विविध देशांमधील महिला संसद सदस्य त्यांचे प्रश्न महिला विषयक कायदे महिलांची सुरक्षितता, सायबर गुन्हे आणि सुरक्षेच्या उपाययोजना, जेंडर इक्वॅलीटी, विविध देशात असलेली याविषयीची स्थिती, घेतलेले निर्णय केलेल्या उपाययोजना, राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी करीत असलेले प्रयत्न या सर्वांवर चर्चात्मक परिसंवाद होणार आहेत.
विविध देशाच्या महिला खासदार  सहभागी होऊन प्रतिनिधित्व करणार आहेत. डॉ. मेधा कुलकर्णी या भारताचे प्रतिनिधित्व करतील.

See also  100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार, नागरिकांसाठी मोफत रिक्षा सेवा