भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न

कोथरूड : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सततच्या होणाऱ्या अपमानाविरोधात कोथरुड मधील सर्व सावरकर प्रेमींनी सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त केला. भर पावसात ही या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक सावरकर प्रेमी नागरीक सावरकरांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरले होते. या गौरव यात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी सावरकरजी के सम्मान में कोथरुडकर मैदान में, मैं भी सावरकर अशा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व भारतीयांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, आशा भावना यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांमुळे ब्रिटिशांना भारतातून जावं लागलं. कॉंग्रेसचे नेते सातत्याने महापुरुषांचा अपमान करत आहे. त्यामुळे विरोधकांचं महापुरुषांप्रतीचं प्रेम बेगडी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान देशातील नागरिक कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

See also  महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे