मॉडर्न प्रायमरी इंग्लिश मिडियम शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन  कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

पुणे : वारजे शाखेतील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न प्रायमरी इंग्लिश मिडियम शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन  कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


या वर्षी स्नेहसंमेलनाची थीम उड़ान होती .प्रतिकूल परिस्थितीवर मात करून  गगनभरारी घेणाऱ्या  रतन टाटा, डॉ. आनंदीबाई जोशी , गुंजन सक्सेना , शितलदेवी , सुधा चंद्रन , नवदिप सिंग , रितू करिधल श्रीवास्तव , अर्जुन देशपांडे , अश्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा जीवनप्रवास नाटिका व नृत्यातुन इयत्ता १ली ते ५वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केला . या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवननी झाली.या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख  पाहुण्यां महानगरपालिकेच्या पर्यवेक्षिका सौ. अनिता रेंगडे मॅडम व शालेय समितीच्या व्हिजिटर सौ. वैशाली पिंपळखरे मॅडम यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हेमा बर्डे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध विषयांतील मिळविलेल्या यशाबद्दल पारितोषिके देण्यात आली.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गरिमा वर्मा ,  पाहुण्यांचा परिचय सौ. दिप्ती मांढरे व आभारप्रदर्शन सौ . अंजली पोतनीस यांनी केले . या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.गजानन एकबोटे सर , शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री शामकांत देशमुख सर यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

See also  शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन