कामाचा विश्वास, विकासाचा संकल्प; निम्हण–विधाते यांचा भव्य ‘विजयी संकल्प मेळावा’

पाषाण : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाषाण येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात अपक्ष उमेदवार प्रमोद निम्हण व पूनम विधाते यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेला भव्य ‘विजयी संकल्प मेळावा’ नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या मेळाव्यास अनेक मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला व युवा प्रतिनिधींसह मोठ्या संख्येने जागरूक नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात विश्वास, विकास आणि परिवर्तनाचा सकारात्मक संदेश पसरलेला दिसून आला.

यावेळी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधताना प्रमोद निम्हण यांनी, “मी बोलण्यापेक्षा कामावर विश्वास ठेवणारा माणूस आहे,” असे ठामपणे सांगितले. त्यांनी २००७ साली नगरसेवक म्हणून कार्य करताना प्रभागात राबवलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला आणि त्या काळात प्रभागाचा चेहरा बदलण्यास सुरुवात झाल्याचे नमूद केले. मात्र, अद्यापही अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण करायची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या विकासकामांना पुढे नेण्यासाठी आणि प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी अपक्ष उमेदवार प्रमोद निम्हण व पूनम विधाते यांना ‘शिट्टी व कपबशी’ या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देणे आणि विकासाला नवी गती देणे हा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मेळाव्याच्या शेवटी नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

See also  मुस्लिम समाज बांधवांचे वतीने महाड चवदार तळा येथे समता दिन व रोजा इफ्तारपार्टी.