“आमचे एक मत विकासासाठी राखीव” – नागरिकांचा विश्वास ; बाणेर–बालेवाडी– पाषाण–सुस –महाळुंगे परिसरात जयेश मुरकुटेंचा संवादात्मक प्रचार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे उमेदवार जयेश मुरकुटे यांनी बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस व महाळुंगे परिसरातील विविध सोसायट्यांना भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचार केला. या भेटीदरम्यान अनेक सोसायटीवासीयांनी “आमचे एक मत विकासासाठी राखीव आहे” अशी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करत जयेश मुरकुटेंना पाठिंबा दर्शवला.

या संवाद बैठकीत परिसरातील नागरिकांनी भेडसावणाऱ्या समस्या, त्यावरील उपाययोजना तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, सामाजिक व सांस्कृतिक विकास, पाणीपुरवठा व वीजपुरवठा आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मते मांडली.

जयेश मुरकुटे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना गांभीर्याने ऐकून घेत विकासाभिमुख व नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले. गेल्या २४ वर्षांपासून तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) संपूर्ण ताकदीने उभी असल्याने, परिसरातील सोसायट्यांमध्ये युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

या संवादात्मक प्रचारामुळे जयेश मुरकुटेंना नागरिकांचा विश्वास व पाठिंबा अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

See also  कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मदतीसाठी सहकार्य करु – राज्यपाल रमेश बैस