सुतारवाडी–पाषाण येथे राज ठाकरे यांचे दर्शन; मयूर सुतार यांना दिल्या शुभेच्छा

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सुतारवाडी–पाषाण येथील श्री भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मयूर भगवान सुतार यांना त्यांनी शुभेच्छा देत पाठिंबा व्यक्त केला.

राज ठाकरे यांच्या आगमनावेळी सुतारवाडी–पाषाण–सुस रोड परिसरातील ग्रामस्थांसह महिला मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

सुतारवाडी गावात राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीतील रंगत अधिकच वाढली असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असतानाच मनसेच्या माध्यमातून झालेल्या या भेटीने प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सुस परिसरातून ‘ड’ गटात मयूर सुतार हे एकमेव उमेदवार असल्याने या भागातील ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा आणि राज ठाकरे यांच्या प्रवेशाचा निवडणूक निकालावर नेमका किती परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

See also  अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ, व्यापारी संघटना व साम्राज्य ग्रुप बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सव साजरा