मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलमध्ये उत्साही वातावरणात SAI बॅचचे किट वाटप

कात्रज : मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलमध्ये भारतीय खेल प्राधिकरण अंतर्गत SAI बॅचच्या कुस्तीगीरांचे आज किट वाटप करण्यात आले.

किट वाटपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चाटे क्लासेस व चाटे उद्योग समूहाचे मा.श्री.फुलचंद चाटे सर लाभले होते. भोर-वेल्हा-मुळशीचे नेते पै.कुलदीप (तात्या) कोंडे, यांच्या सन्माननीय उपस्थितीत आणि मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलचे वस्ताद पै.ज्ञानेश्वर (माऊली) मांगडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


संकुलनातील कुस्तीकोचभारतीय खेल प्राधिकरण अंतर्गत NIS कुस्तीकोच पै.वरूण त्यागीसर,आर्मी रिटायर्ड कुस्तीकोच पै.चंद्रशेखर(बापु)धुमाळ, राष्ट्रीय पैलवान कुस्ती कोच पै.संजय(भाऊ)खांडेकर, कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पै.कृष्णा फिरंगे, महाराष्ट्र चॅम्पियन पै.अमोल शेडगे, पुणे शहर पोलीस पै.तानाजी सागर यांच्यासह पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

See also  भारतीय डाक विभागाच्या योजना ग्रामपंचायत स्तरावर राबवा :: जिल्हाप्रमुख चांदेरे यांच्या आव्हान