प्रभाग क्रमांक ९ मधील शाळांच्या पुनर्विकासासाठी नगरसेविका मयुरी राहुल कोकाटे यांचा पुढाकार

पुणे : प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) परिसरातील मनपा शाळांच्या पुनर्विकासासाठी नगरसेविका मयुरी राहुल कोकाटे यांनी पुढाकार घेतला आहे. सुतारवाडी येथील कै. वेणुताई चव्हाण प्राथमिक विद्यालयाची इमारत धोकादायक झाल्याने तिचा तातडीने पुनर्विकास करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सदर शाळेच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारत वापरण्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित पुनर्विकास आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच महाळुंगे येथील कै. भागुजी विठ्ठल खैरे प्राथमिक विद्यालय (मनपा शाळा) यांचा मॉडर्न स्कूल योजनेअंतर्गत विकास करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. या संदर्भातील निवेदन अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांना आज सादर करण्यात आले.

यावेळी भाजप नेते राहुलदादा कोकाटे उपस्थित होते. प्रभागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित व आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

See also  अमोल बालवडकर यांच्या वतीने कीर्तनकार सन्मान सोहळा व भजन साहित्य वाटप कार्यक्रम