भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा वकिलांशी संवाद साधत प्रचार

पुणे : भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी वकिलांशी भेट घेत संवाद साधत प्रचार केला. पुण्यातील सर्व वकील  बंधु-भगिनींची संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनला भेट दिली. तेथील बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि वकील मित्रांशी संवाद साधला.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे आणि वकील संरक्षणाचा प्रभावी कायदा व्हावा, या दोन प्रमुख मागण्या वकील बांधवांनी आपल्याकडे केल्या. त्यावर ह्या दोन्ही मागण्यांचा पाठपुरावा करेन, असे मुरलीधर मोहोळ यांनी वकील बांधवांना सांगितले.

देशातील एकूणच परिस्थितीबाबत चर्चा झाली. त्यावेळी आश्वासक चित्र असल्याचे त्यांनीही आवर्जून सांगितले. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पुण्यात महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन त्यांना केलं. 

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुधारकरजी आव्हाड, ॲड. एस. के. जैन, ॲड नंदू फडके, ॲड. एन.डी. पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संतोषजी खामकर, ॲड. वैशाली चांदणे, ॲड. राजेंद्र दौंडकर,ॲड. कुमार पायगुडे, ॲड. पवन कुलकर्णी, ॲड. रुपाली पाटील, ॲड. मंदार जोशी, ॲड. धर्मेंद्र खांडरे, ॲड. जयश्री चौधरी-बीडकर, ॲड. विवेक भरगुडे, ॲड. शुभांगी ननावरे, ॲड. चित्रा जाणुगडे, ॲड. विजय ठोंबरे, ॲड. ईशानी जोशी, ॲड. मोहना गद्रे, ॲड. राणी कांबळे, पुणे लॅायर सोसायटी अध्यक्ष ॲड. सत्यजित तुपे, ॲड. सचिन हिंगणेकर,ॲड.महेश बडे,ॲड. सागर नेवसे,ॲड.अनिरुद्ध पायगुडे, ॲड. भूषण देवकर,ॲड. सागर सातपुते, ॲड. स्वप्निल अवधूत, ॲड. गणेश वर्पे, ॲड. मनिष पाडेकर, ॲड. रमेश परदेशी, ॲड. अनिश पाडेकर, ॲड. सचिन ननावरे, ॲड. अभिषेक जगताप, ॲड. सौमित्र देशमुख यांच्यासह वकील बांधव उपस्थित होते.

See also  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन