महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसाई संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण

पुणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्री शिवसाई संस्थेच्या वतीने प्रभागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात बढेकर ग्रुपचे श्री. प्रवीण बढेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवसाई संस्थेच्या वतीने जयदीप पडवळ यांनी केले होते.

यावेळी पृथ्वीराज दादा सुतार, पुनीत जोशी, बाबूअण्णा मोहोळ, सौ. वासंतीताई जाधव, किशोरभाऊ शिंदे, राजाभाऊ गोरडे, आशुतोष मोकाशी, सुधीर धावडे, संदीप मोकाटे, चेतन भालेकर, संतोष लांडे, नागेश गायकवाड, गोविंदभाऊ थरकुडे, मंगेश खराटे, गणेश शिंदे, सचिन विप्र, नितीन शिंदे, किरण उभे, अनिल बिडलान, विनोद जोगळे, गजानन माझीरे, दीपक दिघे, चंद्रकांत पवार, संतोष पडवळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी एकूण ४३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

त्यापैकी प्राथमिक टप्प्यात १०४ विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले असून उर्वरित विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बॅगचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बर्वे सर यांनी केले. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार असून उपस्थितांनी या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

See also  जागतिक महिला दीना निमित्त " बिटिया फौंडेशन व झाशीची राणी प्रतिष्ठान " च्या वतीने कर्तृत्वान यशस्वी महिलांचा सन्मान