पिंपरी : अयोध्या मधील श्रीराम मंदिरातील संघटित दरोडा प्रकरणी काँग्रेसचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन सुरू आहे या अंतर्गत राम मंदिरा, हनुमान मंदिराजवळ जाऊन प्रार्थने द्वारे, सत्य समोर आणून कारवाईची मागणी करणारे निषेध करण्यात येत आहे.
चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पुलाखालील श्री. राम, श्री. हनुमान, श्री.महादेव आणि शनी मंदिर संयुक्तपणे असलेल्या ठिकाणी आज शहर काँग्रेसकडून रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी असलेल्या सर्व देवतांचे पूजन करून सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये सुरुवातीला रघुपती राघव राजाराम या सामूहिक भजन गाना ने सुरुवात करण्यात आली, त्यानंतर खरा तो एकची धर्म हे प्रार्थना गीत सामुहिक स्वरूपात गाण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, “अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर ट्रस्ट मध्ये ४० दिवसांच्या सीसीटीव्हीतून ७० वेळा झालेल्या देणगी, निधी, पैशांची चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशीची मागणी करणे, आंदोलन करणे ही राम मंदीर, अयोध्या वा हिंदूंची बदनामी नसुन रामा प्रती श्रद्धा व आस्था असलेल्यांच्या भावनेप्रती कर्तव्यपुर्ती आहे.
ते पुढे म्हणाले की, लाखो भाविकांनी श्री रामा प्रती श्रद्धा व आस्थेने दिलेले दान, देणगी यांची सुरक्षा बेमालूनपंणे खुंटीला टांगून राजरोसपणे होत असलेल्या पैशाची व संपत्तीचा लूट ही मंदीर ट्रस्ट कडून ‘रामा’प्रती श्रद्धा व आस्था बाळगणाऱ्यांचा विश्वासघात असून, या विषयी पंतप्रधानांचे मौन मुजोरीपणाचा कळस आहे”.
काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “कसम राम की खाते है मंदिर वही बनायेंगें, या राम मंदिराच्या मुद्द्यावर फार काळ सुरू ठेवलेल्या राजकारणाला भाजपने मंदिर लुटीपर्यंत नेऊन आपला उद्देश रामाच्या नावाने सत्ता मिळवून रामाचीच लूट करून खिसे भरण्याची आहे हे दर्शवून दिले आहे, 40 दिवस सातत्याने 70 दरोडे पडत असताना तिथे ट्रस्टमध्ये असणारे भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक काय करत होते ? का त्यांचाही सहभाग याच्यामध्ये आहे? याची चौकशी होणे गरजेचे आहे.”चोरी और उपर सीना जोरी” असं काम सध्या सुरू असल्याचा दिसून येत आहे याची विशेष चौकशी होऊन चोरांना कडक शासन झालेच पाहिजे”
गांधीवादी विचारवंत बी.आर. माडगूळकर म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिराच्या तिजोरीतून झालेली पैशाची लूट ही अतिशय लांच्छ नास्पद बाब आहे. “मुह मे राम और बगल मे छुरी” या प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्यामुळे हे घडले आहे. हिंदू हिताची बात करणारे लोक आता हिंदू अहिताची कृती करत आहेत. हे लोक रामभक्त नसून नथुराम भक्त आहेत.”
याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, हिराचंद जाधव, अभिमन्यू दहीतुले, राहुल शिंपले, जितेंद्र छाबडा, बी.आर. माडगूळकर यांनी मनोगते व्यक्त केली. आंदोलन प्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश सचिव अशोक मोरे, एन एस यु आय चे नेते अक्षय कांबळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, माजी नगरसेवक रामचंद्र माने, सेवादलाचे ज्येष्ठ नेते अशोक मंगल, पुणे जिल्हा सेवादल कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, सेवा दलाचे माजी अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत बी.आर.माडगूळकर, काँग्रेसचे माजी सरचिटणीस हरीश डोळस, हिराचंद जाधव, राहुल शिंपले, अनुसूचित जाती विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ, जितेंद्र छाबडा, सुरज गायकवाड, रोहित भाट, कबीर मोहम्मद, संदीप शिंदे, संदेश जगताप, नासिर चौधरी, भास्कर नारखेडे, गुंगा शिरसागर, विल्यम साळवी, दीपक भंडारी, विलास सकट, नितीन सोनवणे, रितिका शर्मा, प्रवीण कांबळे, सुरज कोथिंबीरे, देवदत्त रानवडे,अलोक लाड, विवेक विधाते, सिल्वराज अँथोनी, साहेबराव खरात आदी उपस्थित होते.
















