पुणे, बालेवाडी (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडी परिसरातील लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश (तात्या) बालवडकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
यावेळी परिसरातील अनेक बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. समाजातील लहान मुलांप्रती आपुलकी व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या प्रसंगी उपस्थितांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. स्थानिक नागरिकांनीही या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत प्रकाश बालवडकर यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.
















