औंध येथील कुमार पद्मालया व निर्मिती होरायझन सोसायटी लगत असलेल्या समस्यांचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडून पाहणी.

औंध : औंध येथील कुमार पद्मालया व निर्मिती होरायझन जवळील खाजगी रिकाम्या प्लॉटवर होत असलेले अनाधिकृत बांधकाम व टाकण्यात येत असलेला राडारोडा तसेच मद्यपींचा होत असलेला त्रास या संदर्भामध्ये नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पाहणी केली.
यावेळी पोलीस निरीक्षक चिंतामणी ,सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, भाजपा सरचिटणीस सुनील माने, बाळासाहेब रानवडे, सचिन वाडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी अनधिकृत पादचारी मार्गावरील टपऱ्या, मोकळ्या जागेत टाकला जाणारा राडारोडा, मद्यपींचा महिलांना होणारा त्रास, वाहतूक समस्या आधी प्रश्न उपस्थित केले. तसेच या प्रश्नांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे केली.
आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, नागरिकांच्या प्रश्न बाबत प्रशासन व पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. यावेळी कुमार पद्मालया, निर्मिती होरायझन परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

See also  मणिपूर जळत असताना मोदींचे मौन का? : आप चा सवालमणिपूर च्या हिंसाचाराच्या विरोधात आपचा आक्रोश मोर्चा