सुस : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस गावातील स्वच्छता व्यवस्थेची आज सकाळी मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (इ.) श्री. प्रजित नायर यांनी पाहणी केली.
यावेळी परिसरातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेत स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती तसेच काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. परिसरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.सुस परिसरातील स्वच्छता व्यवस्था सातत्याने सुरळीत राहण्यासाठी संबंधित परिमंडळाचे मा. उपायुक्त, DSI व SI यांनी नियमितपणे परिसराची पाहणी करून स्वच्छतेची स्थिती तपासावी आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.
सुस परिसरातील स्वच्छता व्यवस्था सातत्याने सुरळीत राहण्यासाठी संबंधित परिमंडळाचे मा. उपायुक्त, DSI व SI यांनी नियमितपणे परिसराची पाहणी करून स्वच्छतेची स्थिती तपासावी आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.
यावेळी बालेवाडी व बाणेर येथील कचरा वर्गीकरण शेडचीही पाहणी करण्यात आली. कचरा संकलन व वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक वाहन व्यवस्थापन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच परिसरातील नागरी कामांचे योग्य नियोजन करून आवश्यक कामांना प्राधान्य देण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले.नव्याने समाविष्ट झालेल्या भागांमध्ये स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, नियमित व नागरिकाभिमुख करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मा. सभासद श्रीमती मयुरी कोकाटे, मा. उपायुक्त, घनकचरा विभाग श्री. संतोष वारुळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नव्याने समाविष्ट झालेल्या भागांमध्ये स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, नियमित व नागरिकाभिमुख करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरसेविका मयुरी कोकाटे, मा. उपायुक्त, घनकचरा विभाग श्री. संतोष वारुळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
















