हृदयविकाराबाबत जनजागृतीसाठी बाणेरमध्ये ‘वॉकथॉन’

बालेवाडी : बाणेर येथे जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयाचे आरोग्य आणि नियमित व्यायामाचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी मेडिनेक्स्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने ‘वॉकथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे.या मध्ये २०० पेक्षा जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला.

ही वॉकथॉन सकाळी ८ ते ९ या वेळेत मेडिनेक्स्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वीरभद्रनगर, बाणेर येथून सुरू करण्यात आली. ‘आपल्या निरोगी हृदयासाठी चाला ‘या संदेशातून नागरिकांना सक्रिय जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी नियमित चालणे, शारीरिक हालचाल, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. त्याच बरोबर हृदय रोगाची लक्षणे आणि ही लक्षणे दिसताच काय काळजी घ्यावी याबद्दल हृदय रोग तज्ञ डॉ. संदीप कदम उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.

See also  सत्तेसाठी "भाजपबरोबर जाऊन बसायचं" ही भूमिका कोणी मांडत असेल, तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा. पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. -शरद पवार