बोपोडीतील चंद्रमणी नगर, कांबळे वस्तीत नगरसेविका भक्ती गायकवाड यांची पाहणी; नागरी समस्यांची घेतली दखल; तातडीने उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना

बोपोडी : बोपोडी परिसरातील चंद्रमणी नगर आणि कांबळे वस्ती येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगरसेविका सौ. भक्ती अजीत गायकवाड यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिक आणि महिलांशी संवाद साधत परिसरातील विविध नागरी समस्यांची माहिती घेतली.

या पाहणीदरम्यान अंतर्गत रस्त्यांची अवस्था, नाल्यांची स्वच्छता, विद्युत खांबांची स्थिती तसेच कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित समस्यांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांनी मांडलेल्या अडचणी जाणून घेत त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन गायकवाड यांनी दिले.

परिसरातील नागरी समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात आल्या. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि परिसरातील जीवनमान अधिक सुखकर व्हावे, यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी स्थानिक नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देत परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे नगरसेविका भक्ती गायकवाड यांनी स्पष्ट केले.

See also  MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि डॉ. विश्वजीत कदम यांचा सहभाग