बालेवाडी ममता चौक ते वाकड पूल रस्त्याचे काम प्रगतीपथावर माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांची पाहणी

बालेवाडी : बालेवाडी ममता चौक ते वाकड पुलाकडे जाणार्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातुन सुरु असलेल्या या रस्त्याच्या कामाची पाहणी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली.

यावेळी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंन्ट कॅा. चे अभियंता अभिजित केवडकर, विर पवार, मयुर कनके, अनिल अतकरे यांच्या समवेत सुरु असलेल्या कामाचा आढावा घेत काही बदल देखिल सुचवले. तसेच सदर कामात येणारे अडथळे संबंधित जागा मालकांशी संपर्क साधुन तातडीने दुर करण्याची त्यांना विनंती केली.
बालेवाडी येथील हा रस्ता लवकरच पुर्ण होणार आहे. यामुळे भविष्यात बाणेर-बालेवाडी परिसरातील वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात संपुष्टात येणार आहे.
यावेळी शशिकांत बालवडकर, प्रविण बालवडकर व स्थानिक नागरीक उपस्थित होते.

See also  महिला बचत गटातील महिलांनी केले शिक्षक दिन साजरा