खडकवासला: पुणे-पानशोत रस्त्यावर सोनापूर गावच्या हद्दीत एका वळणावर पानशेत कडुन पुण्याच्या दिशोने आलेल्या रायडर दचाकीस्वाराने दिलेल्याजोरदार धडकेत आंबी येथील एका नागरिकाचाजागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी
झाली आहे. रामदास काशिनाथ निवंगुणे असे मृत्यू झालेल्या
नागरिकाचे नाव असून सारिका निवंगुणे गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीचे नाव आहे. दुचाकीस्वार रायडरही जखमी झाला आहे. रविवारी (दि. 15) सकाळी हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनसार, रामदास काशिनाथ निवंगुणे( वय 52) हे पत्नीसह एका कार्यक्रमासाठी आपल्या गावी आंबी येथे दचाकीवरून ( एमएच 12युबी 9175 ) जात होते. त्यावेळी सोनापूर गावच्या हद्दीत समोरून पुण्याच्या च्या दिशेने आलेल्या
दुचाकीस्वार रायडर यशराज परदेशी याने ( एमएच 12 एक्सएस 9698) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत रामदास निवंगुणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. तर दुचाकीस्वार रायडरही जखमी झाला.
जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रामदास निवंगुणे यांचे नातेवाईक आकाश दत्तात्रय निवंगुणे यांनी फिर्याद दिली असून दुचाकीस्वार रायडर परदेशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेली पोलीस पुढील तपास करीत आहेत.














