अमित शहा कोण ? हिटलर ? मुसोलिनी ? की मुशर्रफ ?
अमित शहांच्या दौऱ्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड : प्रशांत जगताप आक्रमक

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एकदा पुणे शहर दौऱ्यावर आले की, अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी दरवेळी पुणे शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड केली जाते, त्यांना घरातून उचलून पोलिस स्टेशनला ठेवलं जातं, काहींना घरीच स्थानबद्ध केलं जातं. आजही अमित शहा पुणे दौऱ्यावर आले असताना पुण्यात पोलिसांची हीच दंडेलशाही पाहायला मिळाली. कोणताही गुन्हा केलेला नसताना, कोणताही इशारा दिलेला नसताना पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घरातून उचलून नेलं, या हुकूमशाही कारवाईच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे पुणे (पूर्ण) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली.

हिटलर, मुसोलिनी, मुशर्रफ यांना आपल्या विरोधकांची नेहमी भीती वाटायची. अमित शहा कोण आहे ? हिटलर? मुरोलिनी? की मुशर्रफ? अशा शब्दांत त्यांनी सत्ताधारी भाजपला सवाल केला. देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेले गृहमंत्री स्वतःला इतके असुरक्षित समजत असतील तर त्यांना आपल्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का? असाही सवाल प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला.

यापुढे काँग्रेस कार्यकर्त्यांना हात लावाल तर पुणे शहरात पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना व भाजपच्या प्रत्येक नेत्याला काळे झेंडे दाखविले जातील असा इशाराही प्रशांत जगताप यांनी दिला.

See also  अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने पाषाण येथे 'खेळ रंगला पैठणीचा'