विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

पंढरपूर :कार्तिकीयात्रा२०२६ निमित्त २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी #नांदेड जिल्ह्यातील सुधाकर शिंदे दाम्पत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एसटीचा वर्षभर मोफत प्रवास पास प्रदान.कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातील वारकरी संप्रदायातील विविध महाराज मंडळींची संतपूजा केली.

पंढरपुरातील धुंडा महाराज देगलूरकर मठ येथे हा संतपूजेचा कार्यक्रम पार पडला.यावेळी विविध महाराज मंडळींचा सन्मान करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच मासिक आनंदवारी या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. अशा कठीण काळात कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याचे काम संत-महंत आणि महाराज मंडळींनी करावे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी समाजप्रबोधनातून त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्याची गरज आहे.

वारकरी संप्रदायाला समाजप्रबोधनाची मोठी परंपरा लाभली आहे. कीर्तन आणि प्रवचनातून शेतकऱ्यांना संकटाचा सामना करण्याचे बळ मिळू शकते. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, बळीराजा या संकटातून लवकर बाहेर पडेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकरी बांधवांना धीर देण्याचे आणि त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वारकरी संप्रदायाने करावे, अशी विनंतीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी महाराज मंडळींना केली.

See also  वेताळ टेकडी बचाव कृती समिती व पुणे रिव्हर्स रिव्हायल समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची भेट घेत चर्चा केली