पुणे महानगरपालिकेत महापौर आम आदमी पार्टीचा – सुदर्शन जगदाळे शहर अध्यक्ष यांचा  संकल्प, आम आदमी पार्टी आघाडी विस्तार व पदग्रहण सोहळा

पुणे : आम आदमी पार्टी पुणे शहर महिला आघाडी, युवा आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, सोशल मीडिया आघाडी पदाधिकारी पदग्रहण सोहळा मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स टिळक रोड याठिकाणी संपन्न झाला.


आम आदमी पार्टी ची १० वर्षातील यशस्वी वाटचाल व पुढील घोडदौड या संदर्भात महाराष्ट्राचे संघटन मंत्री अजित फाटके पाटील यांनी भाषण केले, पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी पुणे शहरात पक्षाचा विस्तार, आंदोलने व १०००० सक्रिय कार्यकर्ते जोडणे शहरातील प्रत्येक, प्रभागांमध्ये ३० ते ५० कार्यकर्त्यांची सक्रिय कार्यकारणी स्थापन करणे, शहरातील प्रत्येक नागरी समस्या, प्रश्न न्याय व हक्क मिळवून देणे सदरील आघाड्यांचे, समित्यांचे प्रभाग समितीचे काम असणार आहे. पुणे शहरामध्ये आम आदमी पार्टीचा महापौर व १२५ नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प या वेळी करण्यात आले. पुणे शहर युवा आघाडी चे अध्यक्ष अमित म्हस्के यांनी यावेळी युवा बेरोजगार, युवकाना राजकारणातील संधी याबाबतीत मार्गदर्शन केले.
पक्षाचे ग्रामीण भागामध्ये मोहीम आखण्याचे मार्गदर्शन यावेळी महाराष्ट्राच्या पदाधिकऱ्यांकडून करण्यात आले. अनेक तरुण, तरुणीनी यावेळी पक्षामध्ये प्रवेश केला. आम आदमी पार्टी पुणे शहरामध्ये येत्या महानगरपालिकेत पक्षाचा झेंडा फडकवल्या शिवाय रहाणार नाही असे यावेळी सभेत सांगण्यात आले.


याप्रसंगी पक्षाचे संघटन मंत्री अजित फाटके पाटील,सचिव प्राजक्ता देशमुख, कनिष्क जाधव, अध्यक्ष सोशल मीडिया महाराष्ट्र,प्रवक्ते मुकुंद कीर्दात,महिला प्रदेशाध्यक्ष सीमा गुट्टे, युवा प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर, पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, उपाध्यक्ष निलेश वांजळे, महासचिव अक्षय शिंदे, सतीश यादव,प्रवक्ते धनंजय बेनकर,महिला शहराध्यक्ष सुरेखा भोसले, युवा आघाडी अध्यक्ष अमित म्हस्के, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष एम अली सय्यद, मीडिया संयोजक किरण कद्रे,निरंजन अडागळे,शहर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

See also  शिरुर व बारामती तालुक्यातील अनुक्रमे मूग व बाजरी पिकासाठी नुकसान भरपाई निश्चित