पुणे महानगरपालिकेच्या कोणत्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रभागात राखीव जागा राहणार वाचा

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेनंतर कोणत्या प्रभागामध्ये आरक्षण पडणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. लोकसंख्येचे प्रमाण विचारात घेतले असता. अनुसूचित जाती, व अनुसूचित जमाती यांच्या संभाव्य जागा पुढील प्रमाणे असण्याची शक्यता व्यक्त केले जात आहे.

यामुळे खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना एससी व एसटी उमेदवारांच्या आरक्षणा नुसार प्रभागामध्ये स्पर्धा करावी लागणार आहे.

संभाव्य अनुसूचित जातीसाठी होणारे प्रभाग
१) फुलेनगर नागपूर चाळ २१००३
२) येरवडा गांधीनगर २०९५८
३) काशेवाडी डान्स प्लॉट २०७९६
४) पुणे स्टेशन जय जवान नगर १९६४०
५) सहकार नगर पद्मावती १९५९६
६) रामटेकडी माळवाडी १९०७०
७) कळस धानोरी १८०१०
८) कोरेगाव पार्क मुंढवा १७२३३
९) औंध बोपोडी १६७४३
१०) गोखलेनगर वाकडेवाडी १५०६७
११) अप्पर सुपर इंदिरानगर १४८६५
१२) नवी पेठ पर्वती १४७८४
१३) जनता वसाहत हिंगणे खुर्द १४५७६
१४) मांजरी बुद्रुक साडेसतरा नळी १३५२०
१५) मुकुंद नगर सॅलेसबरी पार्क १२९५५
१६) खराडी वाघोली १२८६१
१७) आंबेगाव कात्रज १२६९७
१८) कोंढवा बुद्रुक येवलेवाडी ११५३१
१९) महंमदवाडी उंड्री १०५१५
२०) सुस बाणेर पाषाण १०३६७
२१) शिवणे खडकवासला १०१५१
२२) विमान नगर लोहगाव १००८२

संभाव्य अनुसूचित जमातीसाठी होणारा प्रभाग
१) कळस धानोरी २२७४
२) सूस बाणेर पाषाण २१५४

See also  महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना