प्रभाग क्रमांक 9 सुस बाणेर बालेवाडी मध्ये हे झाले आहेत बदल पहा

पाषाण : सुस बाणेर बालेवाडी प्रभाग रचना तयार करताना प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रशासनाने काही बदल केले आहेत. यामध्ये नव्याने पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेली दोन गावे सुस व महाळुंगे प्रभाग नऊ मध्ये समाविष्ट करण्यात आले असून मागील हद्दीमध्ये असलेले पंचवटी परिसर प्रभागातून वगळण्यात आला आहे.

सोमेश्वर वाडी, विधाते वस्ती परिसरातील पूर्वी समाविष्ट असलेला भाग, लमान तांडा, पाषाणगाव, सुतारवाडी, सुस, महाळुंगे, बाणेर बालेवाडी आदि गावांचा समावेश या प्रभाग नऊ मध्ये करण्यात आला आहे. यामुळे आमदार शंकर मांडेकर व आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मतदार संघातील गावांचा समावेश असलेला भाग या प्रभागात दर्शवण्यात आला असल्याने. या प्रभागाची रचना मिनी आमदारकी अशी तयार झाली आहे.

भाजपाचे वर्चस्व असलेला प्रभाग तयार करण्यात आला असून या परिसरामध्ये लोकसभा व विधानसभेला भाजपाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. सध्या या प्रभागामध्ये भाजपाचे तीन तर राष्ट्रवादीचा एक नगरसेवक मागील निवडणुकांमध्ये विजय झाले होते. नव्या प्रभाग रचनेमध्ये सुस व महाळुंगे नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा समावेश झाला असल्याने या गावातील मतदार पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेत मतदान करणार आहेत.

सुस बाणेर बालेवाडी ची प्रभाग रचना पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://adc-ecos.enlightcloud.com/1133pmcwebsitev2/s3fs-public/election2025/draftward/ward-09.pdf

See also  माजी नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्यावतीने कोथरुडमध्ये श्री गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना  गावी जाण्यासाठी मोफत बससेवा