पुणे : काँग्रेस सरकारने तुमच्याकडून महागाई आणि भ्रष्टाचारचा डबल टॅक्स घेतला. आम्ही सत्तेत आल्यानंतर महागाईवर नियंत्रण आणले आणि भ्रष्टाचारवर मोठी कारवाई केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली यावेळी ते बोलत होते.
मनमोहन सरकारने 10 वर्षात जितका विकासावर खर्च केला तितका खर्च आम्ही फक्त 1 वर्षात करतो. आज देश विकासाच्या मार्गावर असून स्टार्टअप इंडियात लोकांनी 10 वर्षात सव्वा लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप बनवले आहे. त्यांच्या काळात भारत मोबाईलची आयात करायचा मात्र आमच्या काळात भारत मोबाईल निर्यात करतो. येत्या काही दिवसात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हे मोदी सरकारचे मिशन असून त्याचा परिणाम आता दिसत आहे आणि तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही बुलेट ट्रेनमधून प्रवास करणार. आता देशात 70 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील लोकांना मोफत उपचार मिळणार ही मोदींची गॅरंटी आहे असं देखील मोदी म्हणाले. तर या लोकसभा निवडणुकीत एनडीए पुणे जिल्ह्यात चारही जागा जिंकून विजयचा चौकार मारणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांच्यावर टीका करत मोदींनी नाव न घेता काही भटकत्या आत्मा असतात. त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तर त्या आत्मा भटकत राहतात. महाराष्ट्र अशा एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाला आहे अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली. भटकत्या आत्मा स्वतःचे काही नाही झाले तर दुसराचे बिघडविण्याची काम करतात. आमचा महाराष्ट्र अशाच भटकत्या आत्माचा शिकार झाला आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, आढळराव पाटील, सुनेत्रा पवार आदी उपस्थित होते.