पाषाण : पाषाण येथील श्री वाकेश्वर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ७५००० रकमेचा चेक जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे सुपूर्त केला.
सामाजिक बांधिलकीतून श्री वाकेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी स्वेच्छानिधी गोळा करून मराठवाड्याच्या पूरग्रस्तांसाठी निधी संकलन केले. जमा झालेला पंचाहत्तर हजार रुपये निधी चेकद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र दुडी यांच्याकडे “मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्त केला.
या प्रसंगी अध्यक्ष श्री हरीश भाई पाठक, उपाध्यक्ष श्री रमेश जोशी, सचिव श्री रत्नाकर मानकर, खजिनदार श्री गोपाळ निजसुरे हजर होते.जिल्हाधिकाऱ्यांकडे चेक सुपूर्त करण्यासाठी सौ कल्याणी टोकेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
ज्येष्ठ नागरिकांच्या या सामाजिक जाणिवेचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक करून सगळ्यांचे आभार मानले
घर ताज्या बातम्या पाषाण येथील श्री वाकेश्वर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला...























