शताब्दी बुद्ध विहार येथे श्रामणेर शिबिराचा समारोप

पुणे :  श्रामणेर शिबिरामध्ये युवकांच्या मनाची जडणघडण योग्य प्रकारे आणि संबंधित विषयांच्या तज्ञ लोकांकडून झाल्यामुळे अशा युवकांची नक्कीच वैयक्तिक, सामाजिक आणि धार्मिक प्रगती होऊ शकते असे श्रामणेर शिबिर समारोप कार्यक्रमामध्ये सर्व वक्त्यांकडून आणि श्रामणेरांकडून प्रतिपादित करण्यात आले.

शताब्दी बुद्ध विहार, रेंजहिल्स रहिवासी सभा आणि महिला सभा, रेंजहिल्स, पुणे यांच्या वतीने पंधरा दिवसीय निवासी ‘श्रामणेर शिबीर’ १२ ते २६ मे दरम्यान आयोजित करण्यात आले होते. श्रामणेर शिबिराच्या समारोप प्रसंगी माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांची “मनाची अमर्याद शक्ति व तणाव मुक्ती” या विषयावरची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळा संपल्यानंतर भंते नागघोष महाथेरो, भंते संघदुता, भंते धम्मानंद, रेंजहिल्स रहिवासी सभा या संस्थेचे अध्यक्ष कलावंत पवार, उपाध्यक्ष डी के माने, सचिव प्रशांत जगताप व श्रामणेर शिबिरार्थींच्या हस्ते दत्ता कोहिनकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच यावेळी श्रामणेर शिबिरामधील उत्कृष्ट शिबिरार्थीना विविध पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक शिबिरार्थीना भारताचे संविधान, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ , बुद्ध वंदना पुस्तिका व इतर पुस्तके अभ्यासासाठी देण्यात आली.

या पंधरा दिवसाच्या शिबिरांसाठी सेवा दिलेल्या सर्व नियमित सभासदांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला.

See also  अत्यंत निराशाजनक आणि पूर्णपणे विसरता येणारा अर्थसंकल्प - पृथ्वीराज चव्हाण