पुणे :भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनाच्या औचित्याने आज रविवारी ‘घर चलो अभियाना’मध्ये खासदार मेधा कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.
कोथरुड मधील डहाणूकर कॉलनी तसेच वुडलँड सोसायटी येथील नागरीकांशी संपर्क साधला. बैठकीत नियोजनही केले आणि 1088 सदनिका धारकांशी मतदानाच्या दिवशी संपर्क साधण्याची योजना तयार केली.
यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनी यावेळी परिसरातील नागरिकांशी विविध विषयांवर संवाद साधला.