परिहार चौक औंध येथे निष्कर्षित केलेल्या भाजी मंडईच्या जागी फुटपाथ करण्यात यावा याकरिता आंदोलन

औंध  : परिहार चौक औंध येथे निष्कर्षित केलेल्या भाजी मंडईच्या जागी फुटपाथ करण्यात यावा याकरिता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते ॲड. डॉ. मधुकर मुसळे मा. नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी औंध  भागातील अनेक नागरिक उपस्थित होते  महिलांची संख्या लक्षणीय होती.

परिहार चौकातील शिवदत्त मिनी मार्केट सोबतचा महापालिकेचा करार 2013 मध्ये संपला असून या संस्थेचे फुटपात वरून निष्कर्षण करण्यात आलेले आहे आता त्या ठिकाणी फुटपाथ निर्माण करण्यात यावा व त्या व्यतिरिक्त या पद पथावर कुठल्याही प्रकारचे पुनर्वसन अथवा गाळे निर्माण करण्यात येऊ नये या मागणीसाठी औंध भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून आंदोलन केले

यावेळी ॲड डॉ मधुकर मुसळे यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली या विषयाचा ते गेले पाच वर्षापासून सतत पाठपुरावा करीत असून महापालिकेची वकील म्हणून बाजू सुद्धा त्यांनी कोर्टात मांडली आहे. शिवदत्त मिनी मार्केट सोबतचा करार 2013 साली संपला असून त्यानंतर या संस्थेने या फुटपाथवर बेकायदेशीर ताबा कायम ठेवला होता मध्यंतरी महापालिकेने तिथे निष्कर्षणाची कारवाई केली आहे

सदर संस्थेने या रस्त्याच्या फुटपाथची जागा अकरा वर्ष भाडेकरांनी घेतली होती व तो भाडेकरार संपला असल्याने सदर संस्था पुनर्वसनासाठी पात्र नाही. महापालिकेच्या मालमत्ता  , अतिक्रमण , दक्षता विभाग  , वाहतूक विभाग इत्यादी सह वेगवेगळ्या विभागाने त्या प्रकारचे नकारात्मक अभिप्राय दिलेले असून अतिरिक्त आयुक्त शीतल उगले मॅडम यांनी सदर संस्थेला जागेवरून निष्काशीत करून जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते त्याचबरोबर सदर ठिकाणी  रस्ता रुंदीकरण प्रस्तावित असून सदर रस्ता व फुटपाथ नो हॉकर झोन म्हणून जाहीर केलेला आहे व सदर संस्थेसोबतचा करार संपला असल्याने सदर संस्थेबरोबर नव्याने करार  देण्यात येऊ नये अशा प्रकारे अभिप्राय संबंधित खाते प्रमुखांनी दिलेले आहेत 
असे असताना सुद्धा महापालिकेतील अतिक्रमण विभागातील एक वरिष्ठ अधिकारी आर्थिक लाभापोटी सदर संस्थेला आयुक्तांची दिशाभूल करून व खोटी माहिती देऊन त्याच ठिकाणी बेकादेशीरपणे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत होता हा प्रयत्न ॲड डॉ मधुकर मुसळे नगरसेका अर्चना मुसळे व नागरिकांनी हाणून पाडला.

मुसळे गेल्या आठ दहा दिवसापासून आयुक्तांसोबत सतत या विषयाचा पाठपुरावा करीत असून त्यांच्या मागणीनुसार आयुक्त श्री. राजेंद्र भोसले, उपायुक्त महेश पाटील,  पथ विभागाचे प्रमुख श्री. अनिरुद्ध पावस्कर यांनी जागेवर येऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

या आंदोलनाच्या वेळी मा. नगरसेविका अर्चना मुसळे श्री प्रकाश खोले श्री विद्याधर भापकर डॉक्टर रमेश वझरकर वसुधा गोगटे मिसेस शिंगारे सौ निजामपूरकर श्री प्रशांत श्रीतूत श्री वसंत साळुंके डॉक्टर मनोहर शेट्टीवार यांच्यासह अनेक नागरिकांनी मनोगत व्यक्त करून या ठिकाणी फुटपाथच निर्माण झाला पाहिजे अशी मागणी केली आंदोलनानंतर सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.
यावेळी ॲड डॉ मधुकर मुसळे, नगरसेविका अर्चना मुसळे, श्री विद्याधर भापकर, डॉ शोभा चांदुरकर,  निखिल दोशी, मिलिंद धोंगडे,  मोहना मोहरील,  विनया वैद्य, अनुराधा फातरफोड, दिलीप देशमुख, डॉ.रमेश वझरकर, डॉ. मनोहर शेट्टीवर, पुनम गिलानी वसुधा गोगटे , जयश्री सावंत ,मयूर मुंडे ,प्रशांत शितूत, मिलिंद कदम, रोहन कुंभार, विनय शामराज, अक्षय सांगळे, जमदग्नी वसंत साळुंखे, अरविंद पाटील इत्यादी उपस्थित होते.

See also  जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाच्या रिक्त पदासाठी १८ मे रोजी मतदान