राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने कार्यशाळा संपन्न

पुणे, दि. २९: पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी सिम्बायोसिस स्टॅटीस्टीकल इन्स्टिट्युटच्या संचालक  प्रा.डाॅ शर्वरी शुक्ला, अर्थ व सांख्यिकी प्रादेशिक कार्यालयाचे  सहसंचालक  हणमंत माळी, माजी संचालक विजय आहेर, उपायुक्त संजय कोलगणे, कृषी सहसंचालक  शशिकांत म्हेत्रे, पशुसंवर्धन सहसंचालक सुषमा जाधव,उपसंचालक संजय मरकळे  जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.

विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून दरवर्षी २९ जून रोजी साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाने या वर्षाचे  ‘यूज ऑफ डेटा फॉर डिसीजन मेकिंग हे घोषवाक्य जाहीर केले आहे. देशाचे तथा राज्याचे जिल्हा दर डोई उत्पन्न  काढण्यासाठी लागणारा डेटा सांख्यिकी विभागामार्फत गोळा केला जातो. डेटा कसा गोळा करायचा व त्याचे महत्त्व याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. माळी यांनी सांख्यिकी दिन व घोषवाक्य बाबत सादरीकरण केले तर संजय मरकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

See also  सोमेश्वर फाउंडेशन तर्फे विक्रमी 1069 जणांचे रक्तदान, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन