अधिकारी सुस्त ग्रामस्थ त्रस्त, मुळशी कोळवण खोऱ्यातील रस्त्यांचे दुरावस्था

कोळवण : मुळशी तालुक्यातील शासनाचा अजब कारभार चालू आहे प्रत्येक विभागात सरक्षणा करिता बरिकेट बसवले जात आहे परंतु त्या रोडचा साईड पट्टा मात्र खड्डे व त्यात साठलेले पाणी असे चित्र दिसत आहे काही ठिकाणी रोडवर एवढे पाणी आहे की रस्त्ता कुठे? अशी अवस्था झाली आहे.

मुळशी तालुक्यातील कोळवण विभागात काशिग येथील रोडची ही अवस्था आहे. या विभागातील बांधकाम विभाग अधिकारी करतात तरी काय? पावसाळा पूर्व तयारी केली का?  काही ठिकाणी मुरूमाचे ढीग पडले आहे पण ते साधे पसरवले देखील नाही एवढे अधिकारी सुस्त ग्रामस्थ त्रस्त सद्या तालुक्यात अवस्था झाली  आहे. त्यांना त्याबाबत निवेदन देण्यास गेल्यावर संबंधित अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतात मग अधिकारी असतात कुठे?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोळवण खोऱ्यातील रस्त्याची कामे  लवकर न केल्यास शिवसेना स्टाईल ने संबधीत अधिकारी यांच्या सत्कार करण्यात येईल अशा इशारा शिवसेनेचे युवासेना उपजिल्हाधिकरी अमित कुडले, तालुका समन्वयक नामदेव टेमघरे, प्रदीप बोंद्रे, लहू लायगुडे, योगेश टेमघरे, संतोष टेमघरे देण्यात आला आहे.

See also  बारामती मतदारसंघातील मतदार याद्या गुजरातमध्ये तयार झाल्या? गुजराती लिपीमध्ये मध्ये मतदारांची नावे सापडली