पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या वतीने आयोजन; सहभागी होण्याचे आवाहन


पुणे : मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ऑन पेडल्स Pune on Pedals या सायकल रॅली चे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.


फिटनेस क्षेत्रातील दिग्गज श्री. गजानन खैरे, श्री.अजित पाटील, श्री.दिग्विजय जेधे , श्री.अजय देसाई , श्री लहू उघडे, श्रीमती सुविधा कडलग, श्रीमती अंजली भालिंगे , डॉ. ओंकार थोपटे , श्री. गगन ग्रोव्हर , श्री.रवी नागणे इत्यादी  यांच्या हस्ते या रॅली चा Flag Off होणार आहे.
निलेश मिसाळ, मारुती गोळे , सुनील कुकडे, प्रीती मस्के , कल्याणी टोकेकर, शंकर गाढवे,  राहुल नलावडे,  बाळकृष्ण नेहरकर, आनंद कंसल आदी सायकल पटूंच्या प्रमुख उपस्थितीत या रॅली चा flag off होणार आहे.

सहभागी प्रत्येकास T shirt, मेडल, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. ही सायकल रॅली दिनांक- 17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,कोथरूड येथून सुरू होऊन सांगता – सकाळी 7.30 झाशीची राणी पुतळा बालगंधर्व चौक येथे होणार आहे.
आपणा सर्वांना आवाहन की पुण्यातील सर्व सायकल प्रेमींनी खालील Google Form च्या सहाय्याने आपले नाव नोंदवावे. असे आवाहन माजी आमदार प्राध्यापक मेधा विश्राम कुलकर्णी यांनी केला आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdGMr8SddlOtN6jvuKs6ZuZ86nJ9cVp7OrpMnVkm7P3J4zA5w/viewform?usp=sf_link

See also  औंधगाव तालीम संघाला आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या माध्यमातून कुस्तीचे मॅट सुपूर्द