मनसेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

औंध.ता.७: महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने औंध रोड,बोपोडी,व इंदिरा-कस्तुरबा वसाहत आदी परिसरातील इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला.


मनसे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमा प्रसंगी किशोर वाघमारे,वैशाली जगताप,काका गरबडे,निलेश जुनवणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन औंध  शाखाध्यक्ष मयूर बोलाडे,जितेंद्र कांबळे, सौ . जनाई दत्तात्रय रणदिवे व उपविभाग अध्यक्ष दत्तात्रय रणदिवे यांच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश धोत्रे यांनी केले.

See also  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक मोहिमेत ३२ परवाना कक्ष अनुज्ञप्तीवर कारवाई