माजी नगरसेवक शिवाजी महादेव बंगर यांचे निधन

औंध : बाणेर औंध येथील माजी नगरसेवक शिवाजी महादेव बांगर यांचे प्रदीर्घ आजाराने ३१ जुलै रोजी निधन झाले . ते काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष म्हणून देखील पक्षात काम करत होते . बाणेर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणून तसेच पुणे महानगरपालिकेच्या विधी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा असा परिवार आहे. बाणेर औंध परिसरातील विविध सामाजिक, राजकीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्यावरती बाणेर स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात आला. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, अविनाश बागवे, बाबुराव चांदेरे, कैलास गायकवाड, दिलीप मुरकुटे आदी उपस्थित होते.

See also  दमदार कसला हा तर दिवट्या आमदार - शरदचंद्र पवार