माॅडर्न कॉलेज गणेशखिंड मधे एन ई पी दिवस साजरा

पुणे : गणेशखिंड येथिल माॅडर्न कॉलेज मधे एन ई पी दिवस अंडरस्टँडिग लिगसी आॅफ ईंडियन नाॅलेज सिस्टिम या विषयावर कार्यशाळा घेऊन साजरा करण्यात आला.


डाॅ. संजय खरात यांनी NEP दिवसाच्या निमित्ताने भारतीय ज्ञान परंपरा यावर विस्तृत मांडणी केली. त्यात सरांनी भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमाचा आढावा घेतला. याप्रसंगी ते म्हणाले की भारताला उज्ज्वल असा ज्ञानाचा वारसा लाभला आहे.  याप्रसंगी हा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत भारतीय ज्ञान परंपरेच्या उद्दिष्टासहित व्यवस्थित पोहचला जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यशाळेत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांसाठी भारतीय संख्याशास्त्र आणि पंचमहाभूते याना केंद्रस्थानी ठेवून काही अँक्टिव्हीटीज घेण्यात आल्या.  पंचमहाभूतांची चित्र काढून त्यांचे गुणधर्म सांगणे त्याचप्रमाणे संख्याशास्त्राशी संबधित संकल्पना ओळखणे इ. उपक्रम घेतले गेले.शिक्षकांनीही सकारात्मकपणे भारतीय ज्ञान परंपरेशी संबधीत उपक्रमात भाग घेत नवीन शैक्षणिक धोरण दिवस साजरा केला.


या कार्यशाळेत स्वागत प्रा पराग शहा यांनी केले. डाॅ वर्षा जोशी यांनी भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यासक्रम महाविद्यालयात कशा प्रमाणात राबवला जाईल याची रूपरेषा मांडली. तर आयपीआर वर डाॅ संगीता ढमढेरे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा रंजना शेवकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन डाॅ गौरी कोपार्डेकर यांनी केले. या कार्यक्रमाची बातमी विद्यार्थी रोहित सोनकांबळे याने कव्हर केली.
या कार्यक्रमाला प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह पी ई सोसायटी, डाॅ प्रकाश दिक्षीत, उपकार्यवाह पी ई सोसायटी यांनी शुभेच्छा दिल्या.

See also  पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा.राम ताकवले यांच्या नातेवाईकांची विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडून सांत्वनपर भेट