बाणेर : बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे येथील माता -भगिनींसाठी वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा पुनम विधाते यांच्या नेतृत्वाखाली ‘मंगळागौर स्पर्धा उत्सव नारीशक्तीचा’ हा सोहळा 11 ऑगस्ट 2024 रविवार, रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत 550 महिला भगिनींनी भाग घेतला तर कार्यक्रमाला जवळपास 1500 महिलांची उपस्थिती लाभली.
श्रावण आला की सोबत सणवारांची मोठी पलटणच घेऊन येतो आणि त्यासोबत नवा उत्साहही. मंगळागौरीचं व्रत आणि त्या वेळी खेळले जाणारे खेळ हादेखील असाच एक उत्साहाचा स्रोत. आपल्या मराठी संस्कृतीचा हा मोठा ठेवा तर आहेच, पण दुसरीकडे महिलांचं शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य राखण्याचं कामही हे खेळ करतात. बदलत्या काळानुसार या खेळांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आणि गाण्यांमध्येही आवश्यक ते सकारात्मक बदल करून संस्कृती टिकवण्याचं काम वामा वूमन्स क्लब च्या माध्यमातून अध्यक्षा सौ. पूनम विशाल विधाते यांनी केले आहे.
आज मंगळागौरी स्पर्धेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि महिलांच्या भरभरून प्रतिसादात पार पडला. महिलांचा उत्साह, संस्कृती बद्दल असलेलं प्रेम, एकोप्याची भावना सगळं एकाच ठिकाणी अनुभवायला मिळालं. महिलांना वेगवेगळ्या उपक्रमातून व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचा आमचा प्रयत्न महिलांच्या मिळणारा प्रतिसाद पाहून साध्य होत असल्याचे समाधान आहे. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सहभागी महिलांचे आभार : सौ. पूनम विशाल विधाते( अध्यक्ष:- वामा वूमेन्स क्लब )
स्पर्धेचे विजेते स्पर्धक:
१. प्रथम क्रमांक:- संस्कृती ग्रुप एकदंत विहार बाणेर
२. द्वितीय क्रमांक:- राजमाता जिजाऊ ग्रुप डीपी रोड
३. तृतीय क्रमांक:- दशगौरी ग्रुप नचिकेत पार्क बाणेर
४. उत्तेजनार्थ क्रमांक पुराणिक:- हिरकणी ग्रुप आयडिया सोसायटी महाळुंगे
५. श्रावण क्वीन – संजीवनी महाजन
६. उत्कृष्ट वेशभूषा – उषा राजधनी
७. उत्कृष्ट निवेदिका:- स्वरनिशाद ग्रुप डीपी रोड
यावेळी महिलांना विविध पुरस्कारही देण्यात आले. प्रत्येक उपस्थित महिलेला मलाबार गोल्ड कडून भेटवस्तू देण्यात आली.
घर ताज्या बातम्या पूनम विशाल विधाते यांनी आयोजित केलेल्या मंगळागौर स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद