पुणे : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात (स्वायत्त) श्री सी.डी. देशमुख हे रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर यांच्या स्मरणार्थ बँकिंग दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे के.सी. मिश्रा, माजी मुख्य महाव्यवस्थापक, RBI हे होते.
या प्रसंगी के. सी. मिश्रा म्हणाले सगळ्यांचा आर्थिक विकास होण्यासाठी सर्व सामान्यांपर्यंत आर्थिक साक्षरता पोहोचली पाहिजे. हे काम माॅडर्न महाविद्यालय करते आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.”
प्राचार्य डाॅ संजय खरात म्हणाले,” ३२ वर्षांच्या आमच्या महाविद्यालयाने अनेक अनुदाने व पुरस्कार मिळवलेले आहेत. रिझर्व बॅकेचे आर्थिक साक्षरता केंद्र म्हणून मान्यता मिळवलेले आमचे एकमेव महाविद्यालय आहे.”
प्रा. विजया कुलकर्णी,फ्युचर्स बॅकर्स फोरमच्या समन्वयक यांनी माहिती देताना सांगितले की एफ बी एफ तर्फे पथनाट्य, बँक मित्र, बँक कनेक्ट, मॉक बँकिग, मॉक पार्लिमेंट,असे अनेक उपक्रम घेतले जातात. याशिवाय एफबीएफ सामाजिक संस्थांशी जोडलेले आहे. जनधन योजनेसाठी विद्यार्थ्यांनी खुप काम केले आहे. याचा परिपाक हा रिझर्व बँकेचे मान्यता प्राप्त साक्षरता केंद्र हा आहे.
FBF प्राइड 23 ची घोषणा देखील या कार्यक्रमांतर्गत करण्यात आली.
या प्रसंगी एफबीएफ ने प्रशांत घोडके याला एफबीएफ प्राईड हा पुरस्कार दिला. मानसी सिंग व ईश्वर टेगिनगिरी याला खास पुरस्कार देण्यात आले.जे विद्यार्थी तीन वर्ष सतत्याने एफबीएफ चे काम करतात त्यांना हे पुरस्कार देण्यात येतात.
आर्थिक साक्षरतेची शपथ विद्यार्थिनी श्रध्दा कुलकर्णी हिने दिली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती पुंड (विद्यार्थी प्रतिनिधी) हिने केले.पाहुण्यांचा परिचय डाॅ पल्लवी निखारे यांनी करून दिला.
या प्रसंगी डाॅ शुभांगी जोशी, उप प्राचार्य, वाणिज्य विभाग, प्रो. पराग शाह – आय क्यु ऐ सी समन्वयक,डाॅ मंजुषा कुलकर्णी, पब्लिसिटी, टीम समन्वयक, प्रा अॅड. अदिती पिंपळे हे उपस्थित होते.