शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचा २४ वा पदविका प्रदान समारंभ संपन्न

पुणे : शासकीय तंत्रनिकेतन पुणे या संस्थेचा २४ वा पदविका प्रदान समारंभ पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमात तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, मिलिंद धोंगडे, संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, शैक्षणिक समन्वयक डॉ. वासुदेव जावरे, अणुविद्युत व दूरसंचार विभागप्रमुख सुनिलदत्त प्रभुणे, नियामक मंडळ सदस्य आदी उपस्थित होते.

या समारंभात स्थापत्य, विद्युत, अणुविद्युत व दूरसंचार, यंत्र, धातुशास्त्र, संगणक, माहिती तंत्रज्ञान, ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग या अभियांत्रिकी विद्या शाखेतील सर्व स्नातकांना पदविका प्रदान करण्यात आल्या.

यावेळी श्री. दराडे यांनी भारतीय प्रशासकीय सेवेमधील संधी, पर्यावरण बदल, नवीन तंत्रज्ञान व कौशल्ये आत्मसात करणे या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांपैकी शाखानिहाय गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मानचिन्हे, पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. श्री. पाटील यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले.

See also  बालेवाडी वेलफेअर असोसिएशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन