पुणे : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येवून ठेपला आहे. सर्वत्र गणेश मंडप उभारण्याची तयारी चालू आहे. परंतू श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांने आपला वेगळे पण जपत माळीण गावातील विद्याथ्यार्ंना शैक्षणिक साहित्य वाटप करित मंडप उभारणी सुरु केली आहे.
साल 2014 साली पुणे जिल्ह्यातील माळीण ह्या गावावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीवर मात करून आज त्या गावातील मुले शिक्षण घेत आहेत. पण खूप सारी मदत मिळून देखील शैक्षणिक साहित्यासाठी अजूनही त्यांचा शोध चालूच होता. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि श्री कसबा गणपती सार्वजनिक संस्था व रमणबाग युवा मंच ट्रस्ट पुणे यांनी संयुक्त विद्यमाने मंडप मुहूर्ताच्या प्रसंगी वेळेस माळीण गावातील विद्याथ्यार्ंना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम श्री कसबा गणपती मंदिरामध्ये पार पडला. श्रीकांत शेटे : अध्यक्ष, सूरज गाढवे :- उपाध्यक्ष, सौ. दिपा तावरे :- सचिव, अक्षय ढेरे: सहसचिव, भूषण रुपदे :- कोषाध्यक्ष, ऋग्वेद निरगुडकर :- सह कोषाध्यक्ष, आशुतोष शेरे :- सह कोषाध्यक्ष, निलेश वकील: कार्याध्यक्ष, मंदार देशपांडे :- स्वागताध्यक्ष, सौ. पल्लवी नेऊरगावकरः हिशोब तपासनीस, . सौरभ धोकटे :- समन्वयक आदी उपस्थित होते.