हांडेवाडी नवले वस्ती रोड येथील काँक्रीट रोड खालील खडी वाहून गेल्याने रस्ता खचण्याची शक्यता, शिवसेनेची दुरुस्तीची मागणी

हडपसर : हांडेवाडी नवले वस्ती रोड मधील विहिरीच्या कडेने असलेल्या काँक्रीट रस्त्याखालील खडी पाण्यामुळे निघून गेल्याने रस्ता अधांतरी राहिला आहे. या रस्त्यावरून जड वाहने गेल्यास रस्ता खचून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून महानगरपालिकेने तातडीने दुर्घटना होण्यापूर्वी दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांनी केले आहे.

मुसळधार पावसामध्ये काँक्रीट रस्त्या खाली असलेला खडीचा थर वाहून गेला आहे. यामुळे रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे जीवघेणा अपघात होऊ शकतो.

या रस्त्याचे तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. पुणे महानगरपालिकेच्या पथविभागाने तातडीने पाहणी करून योग्य कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त