माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या नेतृत्वात पाषाण ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपायुक्तांना संत गोरा कुंभार हायस्कूल पुन्हा सुरू करण्याची मागणी केली

पुणे : पाषाण येथील संत गोरा कुंभार हायस्कूल पुन्हा सुरू करण्यात यावे तसेच या हायस्कूलच्या बंद करण्याच्या प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी पाषाण ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या नेतृत्वात शिक्षण उपायुक्त यांची भेट घेत केली.

यावेळी शिक्षण उपायुक्त जगदाळे, शिक्षण उपसंचालक हसन अत्तार, शिक्षण संचालक चौरे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, निलेश निम्हण, राजू सुतार, शिवाजी कोकाटे, संदीप जोरे, सतीश पाषाणकर, सुरेश चक्रनारायण, हणमंत चव्हाण, मोहसीन शेख, रामदास दातार आदी उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना लेखी निवेदन देण्यात आले. पाषाण परिसरामध्ये हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनुदानित शाळेची गरज असताना देखील चुकीचे अहवाल सादर करून शाळा बंद करण्याचा घाट रचला जात आहे.

विशेष बाब म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या मतदार संघामध्ये ही शाळा बंद पाडण्यात आले असून याकडे शासनाचा शिक्षण विभाग सोईस्कर रित्या दुर्लक्ष करत असून या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती करून शाळा सुरळीत चालवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

See also  कोथरूड मैत्री व्यासपीठ आयोजित सर्वपक्षीय स्नेहमेळाव्यात बहरला मैत्रीचा रंग !