शिवजयंती सोहळ्यात प्रथमच किल्लेदार साबळे यांचा स्वराज्यरथ
छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी केले रथाचे उद्घघाटन

पुणे : शिवजंयतीचे औचित्य साधून पुण्यात दरवर्षी शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजीत स्वराज्य रथ उत्सवात पहिल्यांदाच सहभागी झालेला अंजिक्यतारावीर किल्लेदार मानाजीराव साबळे यांचा रथ आकर्षणाता केंद्र ठरला. स्वत: शिवरायांचे वंशंज छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी स्वराज्य रथाचे उद्घाटन केले.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडात सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याचे मानाजीराव साबळे किल्लेदार होते. बादशाहा औरंगजेब यांचा थोरला मुलगा शाहजादा आजम याने अजिंक्यतारा किल्ल्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याचा किल्लेदार मानाजीराव साबळे यांनी ताकदीने मुकाबला करुन किल्ला वाचविण्यासाठी शर्तीचा लढा दिला होता. मात्र शत्रूच्या ताकदीपुढे मानाजीराव साबळे यांना या लढाईत वीरमरण प्राप्त झाले होते. मानाजीराव यांच्या शौर्याबद्दल शिवरायांनी त्यांचा जिजाऊ आईसाहेब यांच्या हस्ते ताम्रपट व जहागीर देवून सन्मान केला होता. अशा मानाजीराव साबळे यांच्या वंशांजांच्यावतीने प्रथमच शिवजयंतीचे औचित्य साधून स्वराज्य रथ काढण्यात आला होता. विशेष म्हणजे शिवरायांचे वंशंज छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी स्वराज्य रथाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले व त्यांनी साबळे कुटुंबियांचा गौरव केला. या रथ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह विविध राज्यांमधील हजारो साबळे कुटुंबियांसह परिवारासह सहभागी झाले होते.

See also  पुणे महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात वैद्यकीय उपचारांची फी ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा उपलब्ध करवी