औंध डिपीरोड परिसरात पालिकेनेच मोकळ्या जागत टाकला कचरा

औंध : औंध येथील सर्वे नंबर 158, 159 येथील मोकळ्या जागेतील खड्ड्यामध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फतच जेसीबीच्या साह्याने कचरा टाकण्यात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्य बाबत पालिका गंभीर आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

औंध डीपी रोड येथील खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साठवून डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून योग्य कारवाई होत नाही. या परिसरामध्ये अनेक नागरिकांना चिकनगुनिया डेंगू चा त्रास सहन करावा लागत आहे. यातच रस्त्यावरील पडलेला मोठ्या प्रमाणात कचरा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून उचलून नेणे अपेक्षित असताना हा कचरा जेसीबीच्या साह्याने खड्ड्यात सरकवला जात आहे.

महानगरपालिकाच अशा पद्धतीने कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी आपल्या दारातील कचरा दुसऱ्याच्या दारात टाकण्याचा प्रकार करत असल्याने याबाबत कारवाई कोण करणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

औंध डीपी रोड परिसरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात तसेच बांधकामासाठी खोदण्यात आलेला खड्ड्यातील साठलेले दुर्गंधी निर्माण करणारे पाणी काढण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  पौड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना केले पोषक आहाराचे वाटप ;138 क्षयरोग रुग्णांना घेतले दत्तक