पुणे : वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या डाॅ. राजेश्वरी संजय व्होरा यांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाच्यावतीने शहरप्रमुख संजय मोरे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी उपशहरप्रमुख डाॅ अमोल देवळेकर, विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, राजेश मोरे, अजय परदेशी, भगवान वायाळ, अनिल परदेशी, किशोर दुर्भे, मोहन पांढरे, संतोष गवळी, महिला आघाडीच्या पद्मा सोरटे, रोहिणी कोल्हाळ, सोनाली जुनवणे, राजू कांबळे उपस्थित होते. उपविभागप्रमुख अनिल परदेशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे इमर्जन्सी मेडिसीन हा विषय अभ्यासक्रम सुरु केला आहे. सन २०२२ पासून सर्वत्र हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने बंधनकारक केले आहे. हा विभाग नविन व अत्यावश्यक असून खुप महत्वाचा आहे. महाराष्ट्राची १३ कोटी लोकसंख्या असून कुठल्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु नाही. पुण्यामध्ये अपघातग्रस्त ट्रॉमा रुग्ण तसेच विवीध आकस्मित आजार जसे हृदयरोग, मेंदूमध्ये होणारा रक्तस्त्राव, इत्यादी आजार वाढीस लागले आहेत. त्यासाठी विशेष प्रशिक्षीत मनुष्यबळाची म्हणजेच एम डी. इमर्जन्सी मेडिसीन पदवीधारक डॉक्टर यांची आवश्यकता होती. सद्यस्थितीत एम.डी. इमर्जन्सी मेडिसीन हा पदवी अभ्यासक्रम पुण्यामध्ये उपलब्ध झालेला आहे. बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय येथे डॉ. राजेश्वरी संजय व्होरा या प्राध्यापक व विभागप्रमुख, इमर्जन्सी मेडिसीन या पदावर कार्यरत असून सक्षमपणे सांभाळत आहेत. तसेच २४ तास सेवा रूग्णांना देण्यासाठी त्यांनी आपली टिम ससून सर्वोपचार रुग्णालयामधे कार्यरत ठेवली आहे. रुग्णांना तत्पर सेवा देणे आपले कर्तव्य समजणार्या डाॅ राजेश्वरी संजय व्होरा यांना म्हणूनच शिवसेनेच्या वतीने पुरस्कार देण्यात आला.