सावंतवाडी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) येथे दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या महाअधिवेशनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीने जोरदार तयारी सुरू केली असून संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर व सर्व टीमने अत्यंत सूक्ष्म नियोजन करीत अधिवेशन यशस्वीतेसाठी तयारी सुरू केली आहे.
दरम्यान आज संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश (भाऊ) सावंत, राज्य संघटक तेजस राऊत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांच्या टीमने प्रत्यक्ष सावंतवाडी येथे जाऊन कार्यक्रम स्थळांची पाहणी व इतर नियोजन केले.