एकता तरूण मित्र मंडळाचा सुर्यमुखी गणपती


एकता तरूण मित्र मंडळाचा सुर्यमुखी गणपती
पंडित जवाहरलाल नेहरू रस्त्यावरील गुलटेकडी भागातील नामांकित सूर्यमुखी गणपती मंडळाचे यंदाचे ३७ वे वर्ष असून मंडळाची स्थापना भागा तील गरिब, कष्टकरी व कामगार वर्गातील कार्यकर्त्यांनी सन १९८६ मध्ये केली आहे.

लोकोपयोगी उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजात एकतेचा संदेश देण्याचा यशस्वी प्रयत्न मंडळाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पुटगे, स्व राजेशाम राजभर, स्व शंकर शेरला , स्व सुनील परदेशी,रसुल मोमिन यांनी केली आहे.

मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जरी विविध पक्षांमध्ये काम करत असतील, प्रत्येकाची विचारधारा जरी वेगवेगळी असेल तरी मंडळाच्या माध्यमातून एकत्रित काम करत असताना हेवेदावे सोडून सर्व एकजूटीने काम करत… मंडळाच्या नावाचा सार्थ नावलौकिक राखून आहेत.

मंडळाची आखीव, रेखीव, देखणी श्री बाप्पाची मूर्ती या परिसरात पाहण्यासारखी असते मीत भाषिक हसमुख अशी बाप्पाची सुबक मूर्ती आणि विलोभनीय मुर्ती भागातील नागरिकांना कायमच आपलीशी वाटतं आहे व नवसाला पावते अशी ख्याती आहे.

मंडळाच्या माध्यमातून गणेश शेरला यांनी आपल्या सामाजिक कार्याची व राजकीय कार्याची सुरुवात केली यंदा मंडळाचे ३७वर्ष असल्यामुळे मंडळाचे मार्गदर्शक सचिन खंडागळे ,मारुती कांबळे ,विनायक कडवळे ,प्रदीप वर्मा,नितीन गायकवाड व मंडळाचे अध्यक्ष रुपेश राजभर ,कार्याध्यक्ष दीपक साळुंखे ,उपाध्यक्ष अक्षय मदणे,महेश साळुंखे ,बैजू राजभर ,अभिषेक चित्ते ,नितीन गायकवाड ,अनिल विसरे असे मंडळाचे पदाधिकारी गणपतीची व्यवस्था पाहत आहेत.

वर्षभर मंडळाच्या माध्यमातून विविध सामाज उपयोगी कार्यक्रम जसं की होळीमध्ये नका टाकू पोळी ,दहीहंडी उत्सव , राष्ट्रीय ध्वजारोहण २६ जानेवारी व १४ ऑगस्ट , दिवाळी पहाट व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी, महापुरुषावर निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा दिवाळीमध्ये अनेक नागरिकांना सरमजाम वाटप असे वर्षभर विविध कार्यक्रम मंडळ राबवित असून या माध्यमातून मंडळ कायमच प्रकाश झोतात आहे.

खास करून मुस्लिम बांधवांना सोबत ईद निमित्त सुकामेवा वाटप कार्यक्रम गेले ३७ वर्षे अविरतपणे सुरू आहे. मंडळात अनेक मुस्लिम कार्यकर्ते आहेत मात्र मंडळातील वातावरण हे नेहमीच सर्वधर्मसम भावाचे राहील याची काळजी घेतली जाते. मंडळात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असतो

मंडळाच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

गणेश उत्सवातील दहा दिवस धार्मिक सण करूया साजरे माध्यम जरासा वेगळे…या म्हणी प्रमाणे एकता मित्र मंडळाच्या वतीने मंडळ समोरील गणपती मंदिरात मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते या शिबिरास सहायक पोलीस निरीक्षक अशोक येवले साहेब व व स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस बांधवांनी आवर्जून भेट देऊन एकता मित्र तरून मंडळाच्या सामाजिक कार्याची स्तुती व कौतुक केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश शेरला ,मंडळा चे पदाधिकारी दीपक साळुंखे ,मारुती कांबळे ,मंडळातील ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक नाना कडवळे व व मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.

See also  वायरलेस कॉलनी कडून ॲड. डॉ. मधुकर मुसळे व माजी नगरसेविका सौ. अर्चना मुसळे यांचा जाहीर सत्कार