पुणे : संतभूमी संरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित संत तुकोबांच्या भंडारा,भामचंद्र, घोराडा संरक्षणार्थ किर्तन दिंडी संदेश यात्रा पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार दिवस रोज संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत कीर्तनाद्वारे प्रबोधन जनजागृती केली जाणार आहे.
प्रथमता मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यामधील चिखलगाव येथे दिनांक 24/10 /2024 रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ह भ प मोहनानंद महाराज पुरंदावडेकर यांची सेवा होणार आहे यासाठी मुळशी तालुक्यातील सर्व वारकऱ्यांना विनंती असे की मुळशी तालुक्यातील सर्व कीर्तनकार प्रवचनकार या सर्वांनी 24 तारखेला सायंकाळी सात ते नऊ या वेळेत चिखलगाव येथे उपस्थित राहावे 24 10 2024 उद्यापासून संपूर्ण पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये चार दिवस किर्तन सेवा आयोजित करून भामचंद्र भंडारा गोराडा डोंगर वाचवण्यासाठी सर्व वारकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे.
पुणे जिल्ह्यातील प्रत्येक कीर्तनकाराना एक दिवस तरी या कार्यक्रमाला भेट द्यावी किंवा या कार्यक्रमात सेवा करण्याची इच्छा असेल तर पत्रकावर दिलेल्या फोनवर किंवा ह भ प यशवंत महाराज फाले यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. कुठल्या तालुक्यामध्ये कीर्तन करणार तसे कळवावे तारीख खाली असेल तर तुम्हाला सेवेसाठी आमंत्रण दिले जाईल हि सेवा माऊली तुकोबांसाठी आहे यासाठी कुठलेही मानधन मिळणार नाही आपण स्वतःहून सेवा करायची आहे असे आवाहन करण्यात आले आहे.
