राज्यातील महायुती सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालणारे – कॉँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या  डॉ. शमा मोहंमद यांची घाणाघाती टीका

पुणे : राज्यातील वाढते महिला अत्याचार, बाल लैंगिक  अत्याचारांच्या घटना महायुतीच्या काळात वाढल्या आहेत.  पोर्शे अपघात,  बदलापूर मधील बाल लैगिक अत्याचार प्रकरण असो. दोन्ही प्रकरणात  महायुतीशी संबंधीत आरोपी आहेत. मात्र, त्यांच्यावर आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या विधानसभा निवडणुकीत तर अजित पवार यांच्या पक्षा कडून पोर्शे कार अपघात प्रकरणात मदत करणाऱ्या आमदाराला निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे.  महायुतीचे सरकार हे गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार आहे हे स्पष्ट होते, अशी  घाणाघाती टीका अखिल भारतीय कॉँग्रेस महासमितीच्या राष्ट्रीय प्रवकत्या डॉ. शमा मोहंमद यांनी सोमवारी केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहर कॉँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय कॉँग्रेस महासमितीच्या राष्ट्रीय प्रवकत्या डॉ. शमा मोहंमद यांनी माध्यमांशी संवाद सादला. यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा  तिवारी उपस्थित होते.

डॉ. शमा मोहंमद म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात पुणे शहरात गुन्हेगारीचे  प्रमाण  वाढल्याचे चित्र आहे. या काळात पुण्यात 260 रेप केस, 450 पेक्षा जास्त विनयभांगांच्या प्रकरणांची नोंद आहे. थोडक्यात 2022 पासून 28 टक्के अधिक महिलांशी संबंधित गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पोस्को केसेस तर पांच हजार पेक्षा जास्त नोंदवण्यात आल्या  आहेत. तर एकूण महायुतीच्या काळात महाराष्ट्रात सात हजार पेक्षा जास्त नोंद झालेल्या बलात्काराच्या घटना आहेत.

बादलापूरच्या घटनेने तर देश हादरला पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तेथे फिरकले देखील नाही. उलट ते प्रकरण दाबण्याचा प्रकार झाला. कारण त्या संबंधीत शाळेचे ट्रस्टी हे भाजपशी निगडीत होते. तसेच त्यांनी पालकांच्या आंदोलनाला राजकीय रंग असल्याची टीका केली.

मुलींना सर्वाईकल कॅन्सरची  मोफत लस 
डॉ. शमा मोहंमद म्हणाल्या, आम्ही जेव्हा सत्तेत येऊ त्यावेळी महालक्ष्मी योजनेतून तीन हजार रुपये  प्रत्येक महिन्याला महिलांना मिळणार आहेत. तसेच वर्षाला पाच गॅस सिलेंडर केवळ पाचशे रुपयांत दिले जाणार आहेत. तसेच बरोबार महिलांना बस प्रवास ही मोफत दिला जाणार आहे. ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मदत होईल.. याशिवाय देशात सर्वाईकल कॅन्सर च्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर   9 ते 16 वयोगटातील मुलींना त्यावरील लस मोफत देण्यात येईल. तर प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहेत.

धनंजय महाडीकांवर कारवाई व्हावी 
महाविकास आघाडीच्या योजना या जनतेला मदत करण्यासाठी आहेत. मात्र माहायुतीच्या योजना म्हणजे मतांसाठी दिलेली लाच आहे. काल भाजप खासदार  धनंजय महाडीक यांनी स्वतःच महिलांना धमकी दिली आहे. ते म्हणाले की, “कॉँग्रेसच्या रॅलीमध्ये ज्या महिला दिसतील त्यांचा फोटो काढून आणा, त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार आही.” यावरून स्पष्ट होते की हे पैसे केवळ महिलांची मतं खरेदी करण्यासाठी दिले जात आहेत. आम्ही महिलांना लाच नाही तर त्यांना सक्षम करण्यासाठी योजना आणत आहोत. धनंजय महाडीक यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी डॉ. शमा मोहंमद  यांनी केली. 

वक्फ बोर्ड, कलम 370 मुद्दे महाराष्ट्रात कशाला?
महायुती सरकारच्या काळात वेदांत – फॉक्सवेगान, टाटा एअर बस सह अनेक महत्वाचे उद्योग गुजरातने पळवले. देशात महागाई, बेरोजगारी वाढत आहे, देशाचे गृहमंत्री अमित  शहा महाराष्ट्रात येऊन वक्फ , कलम 370 असे मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात आणत आहेत, महाराष्ट्रात स्थानिक मुद्दे सोडून अन्य मुद्यावर भाजप का चर्चा करत आहे? असा रोखठोक सवाल डॉ. शमा मोहंमद यांनी उपस्थित केला. महायुती सरकारने महारोजगार मेळाव्यातून लाखों नोकऱ्या देण्याचे सांगितले मात्र प्रत्यक्ष हजारो सुद्धा दिल्या नाहीत असेही त्यांनी नमूद केले.

See also  जन संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष ॲड. रवींद्र रणसिंग यांनी  खासदार सुप्रियाताई सुळे यांना जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण मर्यादा ८०% करावी ह्या मागणीचे निवेदन देण्यात आले