आरक्षण लेंगे..अरे घुस के आरक्षण लेंगे…अशी पंतप्रधान मोदींच्या भर सभेत मराठा तरुणाची लक्षवेधी घोषणाबाजी

पुणे : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा सुरू असताना एका मराठा तरुणाने मराठा आरक्षणावर घोषणाबाजी केली.  आरक्षण लेंगे ..अरे घुस के आरक्षण लेंगे…अशी भर सभेत घोषणाबाजी केल्याने सर्वांचे लक्ष या मराठा तरुणाकडे वेधले गेले.

मराठा आंदोलकाने पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती भूमिका स्पष्ट करत  आरक्षण लेंगे घुसके लेंगे अशी घोषणाबाजी जाहीर सभेत केली. घोषणा देत असताना सभेतील अनेकांचे लक्ष यामुळे वेधले गेले. दरम्यान सुरक्षारक्षक व सभेतील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला समजावत बाहेर काढले.

गेले काही महिने मराठा आरक्षणाचा प्रश्न सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मांडला जात आहे. विधानसभेमध्ये निवडणुका लढवण्याची घोषणा देखील जरांगे यांनी केली होती यानंतर माघार घेत मराठा आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत यावेळी देण्यात आले होते.

यामुळे महाराष्ट्रभर मराठा तरुणांच्या मनामध्ये असलेली खदखद व सरकारच्या विरोधात असलेला राग अशा घटनांच्या माध्यमातून बाहेर पडताना सातत्याने पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मोदींच्या सभेमध्ये करण्यात आलेली घोषणाबाजी ही महायुती सरकारला मराठा आरक्षणावर आगामी प्रचारात बोलायला भाग पाडेल असे सध्या चर्चिले जात आहे.

See also  सोमवारी सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरात शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश