चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आशियाना पार्क बाणेर येथे बैठकीचे आयोजन

औंध  : बाणेर औंध येथील आशियाना पार्क येथे चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ नागरिकांसोबत संवाद बैठक घेण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला परिसरातील समस्या व त्यावरील उपाय योजना याबाबत चर्चा करण्यात आली.

आशियाना पार्क, स्वामी विवेकानंद, बानेर पार्क, शंभू विहार सानेवाडी आदी विविध सोसायटी चेअरमन, सेक्रेटरी, उद्योजक विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या कामाची माहिती देण्यात. तसेच पाटील यांना सर्वाधिक अधिक मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या मीटिंग चे आयोजन मनोज दळवी उपाध्यक्ष कोथरूड यांनी केले होते. त्यांना सहकार्य प्रबोधन मंच यांनी केले. येथे उपस्थित सचिन पाषाणकर, सुभाष भोळ, गणेश कळमकर, प्रकाश तात्या बालवडकर, उद्योजक जय मालपाणी उपस्थित होते.

See also  सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांचा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त उपक्रमपॅरीस २०२४ मधील महाराष्ट्राच्या ऑलिंम्पिक वीरांचा३१ ऑगस्ट रोजी पुणेकरांच्या वतीने होणार भव्य नागरी सत्कार